दुःखद भावनेसह , कुटुंबाचे केले सांत्वन .
भडगाव :- महाराष्ट्र भरात गोंडगाव ता भडगाव येथे घडलेल्या अमानवीय घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अजूनही सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या जनसमुदाय च्या भावना अतिशय तीव्र उमटत आहेत . आरोपीला कठोरात कठोर शाशन झाले पाहिजे या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या चिमुकली च्या घरी ओम नगर पारोळा येथील नागरिकांनी गोंडगाव येथे भेट दिली व पीडित परिवाराचे सात्वन केले. मयत बालिकेचे वडील दिव्यांग असून , त्यांचे घर देखील पत्र्याचे आहे . त्यांची साधारण व हलाखीची असून छोटीश्या टपरीवर व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात . सांत्वन भेट दिली असता ओम नगर मित्रपरिवार कडून 12500 रुपये मदत म्हणून सुपूर्द केली . मदत ही फार मोठी नाही परंतु दुःखात या कुटुंबाला सढळ हाताने मदत करण्यासाठी ज्या ज्या बांधवाना शक्य होईल त्यांनी त्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा ओम नगर रहिवाश्यांनी केली .
आम्ही सर्व नागरिक सांत्वन साठी आलेलो होतो . सदर कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. आम्ही केवळ अतिशय छोटीशी मदत केली. ज्यांना शक्य होईल त्यांनी या कुटुंबास सहकार्य करावे . माणुसकी ला काळिमा फासणाऱ्या या अमानवी घटनेचा आम्ही निषेध करतो .
(समस्त रहिवासी – ओम नगर पारोळा)
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






