झुंजार । प्रतिनिधी
जळगाव : आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपात तुरळक सरींसह बेमोसमी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा चढता आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत असल्याने उकाडा जाणवू लागला. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा चढता असल्याचे जाणवून येत असतानाच वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळी ११ वाजे दरम्यान तापमानाचा पार ३५ अंशावर असून किमान २३ अंश तर हवेतील आर्द्रता ३० टक्के असल्याचे दिसून आले आहे.
येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या पूर्व भागात फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव आदी प्ररीसरात तीन ते पाच मी.मी. तर भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल आणि जळगाव या तालुक्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ते मध्यम हलक्या पावसाची शक्यता आहे