पारोळा :- येथील बूधनाथ मठा जवळील महाराष्ट्र रेस्टॉरंट जवळ भाजीपाला विक्रेत्याच्या अंगावर विद्युत तार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ता १९ रोजी संध्याकाळी ७ .३० ते ८ वाजेच्या सुमारास घडली .
मिळालेल्या माहितीनुसार परमेश्वर ( आबा ) संतोष महाजन ( ४२ ) रा . पेंढारपुर पारोळा ) हे नेहमी प्रमाणे बाजारपेठेतील हाकेच्या अंतरावर हातगाडीवर भाजी पाल्याचे दुकान लावत असतात.
ता. १९ रोजी दुपार पासुन रिमझिम पाऊस सुरु होता संध्याकाळी भाजीपाला विकून पैश्याचा हिशोब लावत असतांनाच अचानक मेन विजेच्या तारच्या भाग मधुनच परमेश्वर महाजन यांच्या अंगावर पडल्याने घटनास्थळी नागरिकांनी सैरावैरा धावत काही विक्रेत्यांनी काठी ने ताराबाजुला सारली त्याच वेळी अनेकांनी महावितरण कार्यालयास फोन करून घटने विषय माहिती दिली.
यावेळी परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला . दरम्यान घटना घडतात परमेश्वर महाजन यांना एका खाजगी डॉक्टरांकडे दाखवण्यात आले मात्र यावेळी त्यांनी उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे सांगितल्याने रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम