कोल्हापूर :- मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याचा नेम कोणीच लावू शकत नाही. कोल्हापूरात जनावरांना चारा देताना विजेच्या झटक्याने सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथं शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. आनंदी मोरबाळे आणि सुनीता मोरबाळे असं मृत्यू सासू सुनेचं नाव आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शामराव मोरबाळे हे जनावरांचे दूध काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आई आणि आपल्या पत्नीला घेवून स्मशानभूमी जवळ असलेल्या गोठ्यात आले होते. दूध काढून ते मोटरसायकलवरून डेअरीमध्ये दूध देण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नीने जनावरांना वैरण बारीक करण्या करीता कुट्टी मशीन सुरू केलं.मात्र काळाने डाव साधला आणि विजेचा धक्का जोरात बसल्याने त्या दोघींचा जमिनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ झालं आई आणि पत्नी घराकडं का आल्या नाहीत हे बघण्यासाठी शामराव मोरबाळे यांनी आपल्या वहिनीला गोठ्याकडे जाऊन पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांना सासू आणि जाऊ जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या. तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलावून विद्युत प्रवाह सुरू असलेलं मशीन बंद केलं. तसेच दोघींनाही उठवण्याचा प्रयत्न केला मात्र मोरबाळे सासू सूनेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






