सतत भूक लागते? काहीतरी खाण्याची इच्छा सतावते? असे का होते, यावर उपाय काय?

Spread the love


4 Reasons Why You’re Always Hungry पोटभर खाऊनही सतत भूक लागते? या ४ गोष्टी आहेत कारणीभूत

सतत काही न काही खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. मग समोर जे दिसेल ते आपण खातो. काहींना चमचमीत पदार्थ दिसताच भूक लागते, किंवा चविष्ट खाण्याची क्रेविंग्स होते. फूड क्रेविंग्स ही वाईट गोष्ट नाही, परंतु अतिप्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

बहुतांश वेळी आपली क्रेविंग्स रिफाइंड कार्बयुक्त पदार्थ खाण्यास वाढतात. ज्यामुळे लठ्ठपणा, डायबिटिज, यासारख्या गंभीर समस्या शरीरात निर्माण होऊ शकतात. सतत खाण्याची इच्छा का होते? क्रेविंग्स कमी करण्यासाठी काय करावे? यावर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट राशी चौधरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती शेअर केली आहे

सतत खाण्याची इच्छा का होते?

Pic for Google


शरीरात प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे सतत काही न काही खाण्याची इच्छा होते. ज्यामुळे आपल्याला पुन्हा – पुन्हा काहीतरी खावेसे वाटते. क्रेविंग्स दरम्यान, आपण जे काही खातो यामुळे इन्स्टंट उर्जा मिळते. पण ही उर्जा दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे आहारात प्रोटीन्सचा समावेश करा. स्नायूंच्या वाढीसाठी, एंजाइम्स सिंथेसिस, यासह पोट दीर्घकाळ भरण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खा.

अपूर्ण झोप.


Pic for Google


जर आपली झोप अपूर्ण होत असेल तर, यामागचे कारण फूड क्रेविंग्स असू शकते. अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू लागते. पूर्ण झोप घेतल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. झोपेचा संबंध पचनसंस्थेशी असतो. पूर्ण झोपेमुळे भूक लागण्याचे संकेत देणारे हार्मोन कंट्रोलमध्ये राहतात. पण अपूऱ्या झोपेमुळे हेच हार्मोन वाढायला लागतात. ज्यामुळे वारंवार भूक लागते.

https://www.instagram.com/reel/CvwfCDlIg2C/?igshid=MzRlODBiNWFlZA==

कार्ब्स क्रेविंग्स यापद्धतीने दूर करा.

Pic for Google


क्रेविंग्स कमी करण्यासाठी आहारात निरोगी फॅट्स, उच्च फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवतात. ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

फायबरची कमतरता

Pic for Google

शरीरात फायबर कमी झाल्यामुळे सतत भूक लागते. फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. फायबर हळूहळू पचतं. फायबरयुक्त पदार्थ भूक कमी करणारे हार्मोन्स तयार करतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहते. त्यासाठी फ्लॅक्ससीड, रताळं, संत्री, ड्रायफ्रूट्स आणि भात खा.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार