यावल : मुलीच्या दुर्धर आजाराला कंटाळून न्हावी येथील पित्याने आपल्या पाच वर्षीय मुलीला विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून नराधम पित्याला अटक केली होती. संशयिताला सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता सह दिवाणी न्यायाधीश न्या.व्ही.एस.डामरे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठुशा भावलाल बारेला (32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
विहिरीत ढकलून आरोपीने काढला पळ
अनिता ठुशाशा बारेला (5) या चिमुकली दुर्धर आजार असल्याने त्यास कंटाळून आरोपीने मुलीला सोबत घेत तिला विहिरीत ढकलून मूळ गावी पळ काढला होता. पाच वर्षीय अनिताचा मृतदेह गावालगत असलेल्या धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेत विहिरीत शनिवारी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती तर तपासात आरोपी पित्यानेच हा खून केल्याचे उघडकीस आले होते.
मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यप्रदेशातील झिरण्याजवळील गुलझरी गावातून रविवारी दुपारी आरोपी पित्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली. मुलीला जडलेल्या दुर्धर आजाराला कंटाळून आपण तिला विहिरीत ढकलून दिल्याचे त्याने कबुली दिल्याने रात्री उशिरा छंडा वेरला बारेला (57, गोणट्या पिपल्या, भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीला सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा