Viral Video: आपण रस्त्यावरून वाहने चालवताना कशी काळजी घेतो? अनेकदा मोठ्या ट्रकच्या बाजूने दुचाकी चालवत असताना हवेचे हेलकावे बसत असतात. तर ट्रकच्या बाजूने चालणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी मोठ्या ट्रकच्या शेजारून गाडी चालवताना दिसत आहे. सिग्नलला वाहने थांबले असताना ती मोठ्या ट्रकच्या अगदी जवळून गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात सिग्नल सुटतो आणि ट्रकचालकाला सदर दुचाकीवरील मुलगी न दिसल्यामुळे तो तिच्या अंगावरून गाडी घालतो.
या अपघातामध्ये तरूणीच्या दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले पण सुदैवाने ही तरूणी बचावली आहे. दोन्ही चाकाच्या मध्ये आल्यामुळे ती बचावली आहे. “दैव बलवत्तर म्हणून ती वाचली, आपण नेहमी ट्रक चालकांना दोष देतो, पण तुम्ही ही दुचाकी वाहन चालवताना मोठ्या वाहनांच्या “ब्लाइंड स्पॉट” मध्ये चालवण्याची चूक करू नका…नशीब प्रत्येकवेळी साथ देत नाही…!!!” असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर वाहने चालवताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.






