सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी सीएजीमध्ये १७७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी नियुक्ती २०२३) ने प्रशासकीय सहाय्यक पदांसाठी सरकारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

पात्र उमेदवार cag.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. २१ ऑगस्टपासून या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे अनिवार्य आहे.

ज्या उमेदवारांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तेथे सूचना वाचून घ्याव्या. अर्जदाराचे कमाल वय १८-२५ वर्षे असावे. यासोबतच गुणवत्तेच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल.

असा करा अर्ज

• सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा, सूचना वाचा सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

• अर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे तयार करा.

• तिथे दिलेल्या ऑनलाइन अर्जावर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जा.

• सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि विचारलेली कागदपत्रे जसे की फोटो, प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करा.

• फी ऑनलाइन भरा आणि प्रिंट आउट घ्या.

हे पण वाचा

टीम झुंजार