राजकीय पोळी भाजू नये त्याचे श्रेय घेऊ नये दिला इशारा.
धरणगाव :- शहरातील अतिक्रमण बेघर नागरिकांचं सर्वेक्षण २०१९ मध्येच मी नगराध्यक्ष असताना केलेला असून त्यासंदर्भात कोणीही राजकीय पोळी भाजू नये व त्याचे श्रेय घेऊ नये असे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले दोन दिवसापूर्वी धरणगाव अतिक्रमण बेघर नागरिकांचा संरक्षण संदर्भात संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले असता त्या संदर्भात निलेश चौधरी बोलत होते.
धरणगाव शहरातील कोट बाजार परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पत्रकार परिषदेचे आयोजन २२ आगष्ट रोजी सायंकाळी केले होते.
यावेळी निलेश चौधरी म्हणाले की 2019 मध्ये चेतन सोनार यांच्या एजन्सी मार्फत द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील या भागांचं सर्वेक्षण केले होते परंतु लॉकडाऊन लागले म्हणून ते काम थांबले त्यात तीन वर्ष खंड पडला व लगेच नगरपालिकेवर प्रशासक लागल्याने ते काम मला करता आले नाही आणि आता हे काम पालिकेने केले पाहिजे परंतु काही राजकीय प्रतिनिधी हे स्वतः श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही निलेश चौधरी यांनी केला ते म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हे या गटाचे पिंड असून आम्ही या संरक्षणाला विरोध करत नाहीत असेही ते म्हणाले.
तसेच धरणगाव शहरात तीन दिवसापूर्वी महाकावड यात्रेचे आयोजन केले असताना आमच्या गटाने ज्या घोषणा दिल्या त्याचाही चुकीचा अर्थ प्रतिस्पर्धी गट करीत असून समाजामध्ये चुकीचे मेसेज पसरवत आहेत. मला भाविकांच्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या तसं समजत असतील तर मी भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो असे निलेश चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर एडवोकेट शहर शरद माळी यांनी सांगितले की शहरातील अतिक्रमण संदर्भात २०१८ मध्येच केंद्राचा व राज्याचा जीआर आलेला आहे त्या संदर्भात आमच्याकडे कागदपत्रे पुरावा सुद्धा असल्याचे माळी यांनी सांगितले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






