यावल : पंचायत समिती समोर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी कडून शहरातील अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पाऊने पाच तास सदर आंदोलन चालले तेव्हा वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेशाची उल्लंघन केले म्हणून पोलिसांच्या फिर्यादीवरून आंदोलनात सहभागी विविध लोकप्रतिनिधी सह राजकीय पक्षांच्या तब्बल ६२ कार्यकर्त्यां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर भुसावळ टी पॉइंट जवळ महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सावखेडासिम ग्रामपंचायतच्या गैरव्यवहार बाबत पंचायत समिती समोर सुरू असलेल्या शेखर सोपान पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत रस्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हा जाणीवपूर्वक रस्ता अडवून अडथळा निर्माण केला तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून
जिल्हा परिषद चे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, यावल चे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे संतोष धोबी, पप्पू जोशी, राष्ट्रवादीचे कामराज घारू, निळे निशाण सामाजिक संघटनेचे विलास तायडे, शिवसेनेचे कडू पाटील, उस्मान तडवी सह ६२ जणाविरुद्ध पोलीस शिपाई सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन