१०८ रूग्णवाहिका चालकांचे विविध मागण्या संर्दभात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मागण्या मान्य न झाल्यास १ सप्टेंबर पासुन काम बंद आंदोलन

Spread the love

जळगाव : जिल्ह्यातील अतितातडीच्या रूग्णवाहिका १०८ वरील चालकांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यांच्या मागण्या संर्दभात या पुर्वी संबधीत कंत्राटदार सोबत प्रशासनाच्या मध्यस्तीने चर्चा झाली होती मात्र, मागण्या मान्य केल्या नाहीये म्हणुन आता मागण्या पुर्ण न केल्यास दिनांक १ सप्टेंबर पासुन संपुर्ण राज्यात १०८ वाहन चालक बेमुदत संप करणार असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कडे जिल्ह्यातील १०८ रूग्ण वाहिकेच्या चालकांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही वर्षांपासुन ते शासनाच्या कंत्राटदार कंम्पनीच्या माध्यमातुन सेवा देत आहेत मात्र, तुटपुंजे मानधन त्यांना मिळत आहे व गेल्या महिन्यात आरोग्य संचालक सोबत कंत्राटदार व चालक यांची संयुक्त बैठक घेत १०८ रूग्णवाहिका चालकांच्या मागण्या बाबत चर्चा झाली व संबधीत कंत्राटदार कंम्पनीने मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र, अद्यापही प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही म्हणुन आता १ सप्टेंबर पर्यंत मागण्या पुर्ण न केल्यास संपुर्ण महाराष्ट्रात १०८ रूग्णवाहीका चालक बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला आहे.

अशा आहेत मागण्या.
१०८ आपत्कालीन सेवा ही महाराष्ट्र शासनाची अत्यावश्यक सेवा असल्यामुळे या सेवेतील सर्व कर्मचार्यांहना शासन सेवेत विनाशर्त सामावून घेण्यात यावे,”समान काम समान वेतन” देण्यात यावे, आजपर्यंत आमचे बीव्हीजी कंम्पनी मार्फत अत्यंत तुटपुंज्या मानधनावर ठेवून जे आर्थिक शोषण करण्यात आले आहे त्याची एप्रिल २०१४ पासून आजपर्यंतची तात्काळ भरपाई मिळावी, सर्व कोरोना योद्धयांना २०२० आणि २०२१ या दोन वर्षांचा कोविड भत्ता तात्काळ देण्यात यावा.

हे पण वाचा

टीम झुंजार