एरंडोल येथील कन्या डॉ कल्याणी पाटील युक्रेन विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण होऊन आल्याबद्दल सन्मान

Spread the love

एरंडोल :- येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी बी पाटील व सुनंदा पाटील यांची कन्या डॉ कल्याणी पाटील ही नुकतीच युक्रेन विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण होऊन आल्याबद्दल तिचा धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुनील चौधरी यांच्या हस्ते क्रांतीज्योती मातोश्री सावित्रीआई फुले यांचा ग्रंथ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. आई-वडिलांच्या पाठींब्यामुळेच आपण हे यश प्राप्त करू शकलो, असे डॉ कल्याणी पाटील यांनी सांगितले.

पालकांनी मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यायला हवे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. डॉ कल्याणी पाटील यांच्या सन्मानासाठी भाऊसाहेब सुनील चौधरी, विखरण येथील मुख्याध्यापक डी वाय पाटील, भाऊसाहेब विजय पाटील, गोकुळ पाटील, सी बी पाटील, सौ सुनंदा पाटील, प्रा ज्ञानसागर सूर्यवंशी, पाचोर्‍याच्या एम एम कॉलेज येथे कार्यरत प्रा डॉ अतुल सूर्यवंशी हे उपस्थित होते. डॉ कल्याणी पाटील यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार