सावदा l प्रतिनिधी (प्रशांत सरवदे) :- बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारूती दर्शनासाठी दुचाकीने जाणाऱ्या सावदा येथील दोन सख्ख्या चुलत भावांना अज्ञात वाहनाचे जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी २६ ऑगस्ट रोजी घडली.
या अपघात दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. भास्कर कुंभार आणि लखन कुंभार असे मयत झालेल्या तरूणांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारूतीचे प्रसिध्द मंदीर आहे. याठिकाणी दर शनिवारी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आज २६ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील शनिवार असल्याचे रावेर तालुक्यातील सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाडा येथे राहणारे भास्कर कुंभार हा त्याचा चुलत भाऊ लखन कुंभार यांच्या सोबत दुचाकीने मारूती दर्शनासाठी गेले.
दरम्यान बहार्डी गावानजीक एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर कुंभार याचा जागीच मृत्यू झाला तर लखन कुंभार हा जखमी झाला. त्याला तातडीने भुसावळ येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे आधार होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






