……………………………………….
???? रणजीत सोनवणे यांची पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रमुख पदी निवड.
???? बी.टी. सपकाळे व राममुर्ती रायसिंग यांची विभागावर निवड
………………..✒️…………………..
जळगाव :- शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून खात्यातील अनेक अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे शिक्षकांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. पैसे दिले नाही तर अनेक प्रकारच्या त्रुटी काढल्या जातात. अशी व्यवस्था संपविणे हेच शिक्षकांचे कर्तव्य आहे. याकरिता शिक्षकांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन समता शिक्षक परिषदेच्या जिल्हास्तरीय सभेत प्रदेक्षाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी अध्यक्षीय भाषणात केले. रायसोनी नगर, जळगाव या ठिकाणी संघटनेची जिल्हास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती. सभामंचावर संघटनेचे राज्य सल्लागार धनराज मोतीराय, प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप,विभागीय अध्यक्ष बी.एन. पाटील, महिला विभाग अध्यक्षा डाॅ. कविता सोनवणे, उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष प्रमोद आठवले, जळगाव जिल्हा पूर्व विभाग अध्यक्षा मनीषा देशमुख, पश्चिम विभाग अध्यक्ष रणजीत सोनवणे, उपक्रम विभाग जिल्हाध्यक्ष मनोज ननवरे, महिला विभाग अध्यक्षा छाया बैसाणे प्राथमिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अजय भामरे, आदींची स्टेजवर उपस्थिती होती.
शिक्षण व्यवस्था समृद्ध करण्याकरिता साप्ताहिक सुरू करणे, नोव्हेंबर महिन्यातील संघटनेच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनावर चर्चा करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांकरिता तात्काळ वेतनश्रेणी लावून लवकरात लवकर फरक अदा करणे करिता शिक्षण विभागाशी चर्चा करणे, एकाच वेळेस अनेक परीक्षांचा भडीमार करणाऱ्या शासनाला दिल्या जाणाऱ्या ‘शिक्षकांना शिकवू द्या’ या निवेदनावर चर्चा करणे, नेट -सेट व पीएचडी धारक शिक्षकांच्या विशेष वेतन वाढ लागू करणे तसेच शासनाच्या शिक्षण विभागातील वर्ग दोनच्या पदांवर नियुक्ती करणे इ. मागणी करिता शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेब यांच्या भेटीचे नियोजन करणे, जिल्ह्यातील नवोदय परीक्षा व इतर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुगल मीट वर मार्गदर्शन सत्राच्या आयोजनावर चर्चा करणे, डिसेंबर महिन्यामध्ये 25 पुस्तके प्रकाशनाचा भव्य सोहळा आयोजित करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी संघटनेच्या सचिव वर्षा आबासाहेब अहिरराव यांनी संघटनेला 50 पुस्तकांचा संच भेट दिला. नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या शिक्षक पुरस्कार निवड समिती प्रमुखपदी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर समितीवर प्रत्येक तालुक्यातून एक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. जळगाव माध्यमिक पतपेढीचे माजी संचालक बी.टी. सपकाळे सर यांची संघटनेच्या खानदेश विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राममूर्ती रायसिंग यांची प्राथमिकच्या खान्देश विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. शिक्षक मनोज बिऱ्हाडे आणि शिक्षिका चित्रा पगारे/ बिऱ्हाडे यांची अनुक्रमे प्राथमिक विभागाचे उपाध्यक्ष व सचिव पदी निवड करण्यात आली. राजाराम सोनवणे यांची प्राथमिकच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच प्रतिभा सोनवणे यांची चोपडा तालुका महिला विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, बी.टी.सपकाळे, धनराज मोतीराय, उ.म. कार्याध्यक्ष प्रमोद आठवले, विभागीय अध्यक्ष बी. एन. पाटील, उपाध्यक्ष गणेश बच्छाव अजय भामरे, यांनी मनोगत व्यक्त केले. साप्ताहिक ‘सत्य शिक्षण’ संपादक मंडळावर अजय भामरे सोपान भवरे, डॉक्टर कविता सोनवणे, बी एन पाटील, वर्षा अहिरराव, बापूराव ठाकरे, रणजीत सोनवणे, सुधाकर मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळेस संपादक मंडळाचा सत्कार करण्यात आली.
सदर प्रसंगी विभागीय कार्याध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण केदार, हेर्मेंद्र सपकाळे, विनोद सपकाळे, प्राध्यापिका शालिनी बिऱ्हाडे, प्राध्यापिका ज्योती मोरे, प्रज्ञा बाविस्कर, प्रकाश तामस्वरे, सुधीर महाजन, जीवन शिरसाठ, सय्यद सादिक, मनीषा ठाकरे, जीवन कुमार शिरसाठ, सुधाकर मोरे, कैलास पवार, गायत्री जैन, चिंतामण जाधव, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरातील मोठ्या प्रमाणावर शिक्षक सदर सभेस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आठवले यांनी केले तर आभार धनराज मोतीराय अण्णा यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४