एरंडोल वि. का. संस्थेच्या पात्र लाभर्थी शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती योजनेचा लाभ द्यावा, तहसीलदार यांना निवेदन.

Spread the love

तहसीलदार कार्यालयात केले आंदोलन पहा व्हिडिओ

प्रतिनिधी | एरंडोल

 एरंडोल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना  महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत  कर्जमाफी प्रोत्साहन पर अनुदान लाभ द्यावा अशी मागणी वि. का. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून तशा आशयाचे निवेदन तहसीलदार सुचिता चौव्हान यांना देण्यात आले आहे. 
 शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत  सन 2019 या वर्षी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना जाहीर केली होती परंतु या योजनेत  संस्थेच्या ८०२ शेतकऱ्यांपैकी फक्त ६८९ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून

अद्याप पावतो ११३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असतांना देखील त्यांना लाभ मिळालेला नाही व जे शेतकरी नियमित कर्जफेड करीत आहेत त्यांना शासनाने प्रोत्साहन पर ५० हजार रुपये रक्कम देण्याचे निश्चित केले असताना आमच्या संस्थेचे ४१५ शेतकरी पैकी २२२ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून १९४ शेतकरी अजुनही या लाभा पासून वंचित आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे

याप्रसंगी सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी बोंबाबोब आंदोलन करुन कांद्याच्या भवाबद्दल नाराजी व्यक्त केली व शेवटी आमच्या संस्थेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आमची मागणी आपल्या मार्फत शासनाकडे पाठवावी अशी विनंती करण्यात आली निवेदनाच्या प्रती  सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवण्यात आले असल्याचे नमुद करण्यात आले आहे .


 संस्थेचे चेअरमन विजय महाजन, व्हाईस चेअरमन निर्मलाबाई महाजन,  ज्येष्ठ संचालक दुर्गादास महाजन, रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी, नितीन महाजन, ईश्वर पाटील, योगराज महाजन, , राजधर महाजन वामन धनगर, रघुनाथ ठाकूर, पंडित पाटील, सुमनबाई माळी सचिव बापू पाटील, निमंत्रित संचालक रमेश महाजन, शांताराम महाजन, इच्छाराम महाजन, सुरेश देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, एजाज अहमद, जावेद मुजावर , कर्मचारी मन्साराम महाजन, युवराज महाजन, निंबा माळी, भगवान माळी, अशोक जोशी यांचे सह संस्थेच्या शेतकरी सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हे पण वाचा

टीम झुंजार