एरंडोल येथे जाहारवीर चव्हाण आणि रतनसिंगजी चावरिया जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम.

Spread the love

मेहतर समाजातर्फे शहरात पवित्र छडीची भव्य मिरवणूक पहा व्हिडिओ.

एरंडोल:- येथील वाल्मिक मेहतर समाजाच्यावतीने समाजाचे आराध्य दैवत जाहारवीर गोगाजी चव्हाण आणि रतनसिंगजी चावरिया यांच्या जयंतीनिमित्त विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच रतनसिंगजी चावरिया यांच्या पवित्र छडींचे शहरात आगमन झाल्याबद्दल शहरातून सातही छडींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. येथील वाल्मिक मेहतर समाजातर्फे समाजाचे आराध्य दैवत जाहारवीर चव्हाण आणि रतनसिंगजी चावरिया यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील व समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मेहतर समाजाच्या युवकांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.समाजाचे आराध्य दैवत जाहारवीर चव्हाण आणि रतनसिंगजी चावरिया यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी कार्य करावे असे सांगितले. यावेळी शहरात रतनसिंगजी चावरिया यांच्या सात छड्यांचे (छडी निशाण) प्रथमच आगमन झाल्यामुळे सर्व छड्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याहस्ते छड्यांची पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.मरिमाता चौकापासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली.

शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरून मिरवणूक नेण्यात आली.मिरवणुकीतील छड्यांचे ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.छड्या पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.छड्यामध्ये बाबा केदारनाथ मंदिर,जय महाकाल यांच्यासह विविध धार्मिक
स्थळांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या.सर्व छड्यांना मोरपिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आकर्षक सजावट,छड्यांवर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई,भाविकांनी छड्यांचे नियोजनबद्ध पद्धतीने केलेले सादरीकरण मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी समाज बांधवांनी विविध कलाकृती सादर केल्या.मिरवणूक शांततेत पार पडली. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल,माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील,बबलू चौधरी,युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील,शहर संघटक मयूर महाजन,शहरप्रमुख कृष्णा ओतारी, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे,सुरेश दाभाडे,पापा दाभाडे, गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल महाजन,अमोल तांबोळी, फकीरा खोकरे, अशोक तांबोली,भिका खोकरे, प्रकाश शिरसे,हरिचंद आठवाल,राजेश गोडाले,सुभाष सारसर, शाम गेचंद, कन्हैय्या पवार,सुनील खोकरे,ताराचंद अठवाल, अमोल तांबोली,धम्मा पहेलवान यांचेसह समाजबांधव व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थितहोते

कार्यक्रमासाठी वाल्मिकी मेहतर समाज पंचमंडळ, पहेलवान पुत्र ग्रुपचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन आनंदभाऊ मित्र परिवार,अमोल तांबोली,धम्मा पहेलवान यांनी केले होते.समाजाचे आराध्य दैवत रतनसिंगजी चावरिया यांच्या छड्यांचे शहरात प्रथमच आगमन झाल्यामुळे मेहतर समाजातील नागरिक व महिलांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे अभिनंदन केले.

हे पण वाचा

टीम झुंजार