कृषी संलग्न प्रकल्पांची उभारणी करीत आदर्श निर्माण करणारे युवा शेतकरी मल्हार कुंभार यांचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले कौतुक.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
पारोळा : विविध कृषी संलग्न प्रकल्पांची उभारणी करीत आदर्श निर्माण करणारे युवा शेतकरी मल्हार कुंभार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ आपल्या शेतकरी गटाच्या माध्यमातुन लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल टाकले आहे. याच पध्दतीने पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. आपल्या सह आपला गट आणि परिसर अधिक आत्मनिर्भर करावा असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे. जय किसान कृषी विज्ञान मंडळ, चोरवड ता. पारोळा यांनी पोकरा योजने अंतर्गत ६० टक्के अनुदानावर खरेदी केलेल्या औजारे बँकेचा शुभारंभ खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते पारोळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की मागील ६ महिन्यापासून पोकरा योजनेचे अनुदान मोठ्या प्रमाणात प्रलंबित होते परंतु याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलन करून अखेर जिल्ह्यातील शेतकरी/शेतकरी गटांचे सुमारे रू. ५२ कोटीचे थकीत असलेले अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली असून यापुढे अनुदानाबाबत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी शेतकरी गटाचे अध्यक्ष युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांच्या भावेश पोल्ट्री फॉर्म ची पाहणी करून त्यांनी सुरू केलेल्या विविध कृषी संलग्न व्यवसायाची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पाटील यांनी करून घेतली. त्यांनी सदरील प्रकल्प पाहणी करून युवा शेतकरी मल्हार कुंभार यांचे कौतुक केले. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी उपस्थितांशी खुला संवाद साधत शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतकऱ्यांनी शेतीसोबत कृषी संलग्न व्यवसाय सुरू करावा जेणेकरून स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांना निर्माण होईल व शेतकरी कर्जबाजारी होणार नाहीत.असेही ते म्हणाले. पोकरा योजनेत पारोळा व एरंडोल तालुक्यातील उर्वरित सर्व गावांचा समावेश करण्याबाबतची मागणी नगराध्यक्ष करण दादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची यावेळी सांगत सदरील योजना शेतकऱ्यांकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरील योजनेत वैयक्तिक लाभार्थी शेतकर्‍यांकरिता ठिबक/तुषार सिंचन संच तुषार, पॉलीहाऊस/शेडनेट, मधुमक्षिका पालन, कांदाचाळ, शेततळे, अस्तरीकरण, रेशीम शेती इ. व शेतकरी गटाने करिता भाडेतत्त्वावर कृषी अवजार बँक स्थापन करणे, गोदाम उभारणे, धान्य प्रक्रिया संच खरेदी इ. बाबींकरिता अनुदान उपलब्ध असून शेतकरी व शेतकरी गटाने लाभ घ्यावा असे आवाहन देखील नगराध्यक्ष करणदादा पाटील यांनी एरंडोल व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

यावेळी माजी सरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, प्रशांत पाटील, निंबा पाटील, सुधाकर पाटील, प्रल्हाद कुंभार, गणेश पाटील, जितेंद्र पाटील, राजू पाटील, गंभीर पाटील, नितीन पाटील, भगवान पाटील, मोहन कुंभार, जगन पाटील, अशोक पाटील, मुन्नाभाऊ माने, पप्पू पाटील, प्रवीण सपकाळे (पोकरा समूह सहाय्यक) व शेतकरी उपस्थित होते.पोकरा योजनेत पारोळा व एरंडोल तालुक्यातील उर्वरित सर्व गावांचा समावेश करण्याबाबतची मागणी नगराध्यक्ष करण दादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची यावेळी सांगत सदरील योजना शेतकऱ्यांकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरील योजनेत वैयक्तिक लाभार्थी शेतकर्‍यांकरिता ठिबक/तुषार सिंचन संच तुषार, पॉलीहाऊस/शेडनेट, मधुमक्षिका पालन, कांदाचाळ, शेततळे, अस्तरीकरण, रेशीम शेती इ. व शेतकरी गटाने करिता भाडेतत्त्वावर कृषी अवजार बँक स्थापन करणे, गोदाम उभारणे, धान्य प्रक्रिया संच खरेदी इ. बाबींकरिता अनुदान उपलब्ध असून शेतकरी व शेतकरी गटाने लाभ घ्यावा असे आवाहन देखील नगराध्यक्ष करणदादा पाटील यांनी एरंडोल व पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
यावेळी माजी सरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, प्रशांत पाटील, निंबा पाटील, सुधाकर पाटील, प्रल्हाद कुंभार, गणेश पाटील, जितेंद्र पाटील, राजू पाटील, गंभीर पाटील, नितीन पाटील, भगवान पाटील, मोहन कुंभार, जगन पाटील, अशोक पाटील, मुन्नाभाऊ माने, पप्पू पाटील, प्रवीण सपकाळे (पोकरा समूह सहाय्यक) व शेतकरी उपस्थित होते.

टीम झुंजार