पतीच्या दुसऱ्या लग्नाचे कळताच पोहोचली लग्नमंडपात; नववूधला चोपत नेले पोलीस ठाण्यात
अहमदनगर :- मध्ये पत्नी हयात असताना तिला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे. लग्नाची घटका जवळ येत असतानाच पहिल्या पत्नीने लग्नामध्येच गोंधळ घालून पतीसह वराडींना भेट पोलीस ठाण्यामध्ये खेचलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाल्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी आणि वऱ्हाडी मंडळींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
जालना येथील विशाल पवार याचे लग्न बारा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत झाला होता. आधी लग्न झालेलं असतानाही विशाल पवार हा अहमदनगर येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर तिने आपल्या मुलासह आई-वडिल आणि नातेवाईकांना सोबत घेऊन नगर गाठले आणि ज्या मंगल कार्यालयात विशालचा दुसरा विवाह संपन्न होणार होता त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला.
त्यानंतर पहिल्या पत्नीने तिच्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलेच चोपले. अचानक झालेल्या प्रकारामुळे नवीन वधू आणि दुसरं लग्न करणारा विशाल चांगलाच गोंधळून गेला. व्हराडी मंडळींना देखील काय झाले हे कळत नव्हतं. त्यानंतर लग्नमंडपातूनच कोणीतरी
पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळाने पोलीस त्या ठिकाणी आले आणि सर्व वरात पोलीस ठाण्याला नेण्यात आली.
पोलीस ठाण्यात आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. विशालने कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केल्याचा आरोप पहिल्या पत्नीने केला आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनी विशाल पवार यांच्याविरुद्ध भादवी 494 नुसार पुन्हा दाखल केला आहे.
“माझं लग्न 2011 मध्ये विशाल पवार या व्यक्तीसोबत झालं होतं. लग्नानंतर पती मला त्रास देत होता. अडीच वर्षांपूर्वी त्याने मला घरातून हकलवून दिले. त्यानंतर आम्हाला अचानक माहिती मिळाली की तो अहमदनगरमध्ये लग्न करत आहे. त्यानंतर आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मी दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी,” असे पहिल्या पत्नीने म्हटलं आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






