यंदाचा गणेशोत्सव हा जनजागृती गणेशोत्सव म्हणून साजरा करावा ; पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले. साहेब.
धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव :- आज दिनांक 30/08/2023 रोजी सकाळी 11.30 ते 13.00 वाजे पावेतो धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सदस्यांची मीटिंग घेऊन त्यांना आगामी गणेश उत्सव सन, ईद-ए-मिलाद, दहीहंडी सन शांततेने व कायद्याचे पालन करून पार पाडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सदर मीटिंग पोलीस निरीक्षक श्री उद्धव ढमाले साहेब यांनी तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले. गणेश उत्सवाचे स्थापनेपासून ते विसर्जन पर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. सदर मिटींगला 60 ते 70 सदस्य हजार होते.
तसेच यंदाच्या गणेशोत्सव हा जनजागृती गणेशोत्सव म्हणून साजरा करावा बाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्याबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना पोलीस निरीक्षक साहेबांनी मार्गदर्शन करून आवाहन केले आहे. चोरी ,घोरफोडी त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासंदर्भात गणेश मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करावी याबाबत देखील मार्गदर्शन केले.
सदर मिटींगला धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हवालदार मिलिंद सोनार, विजय शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल वैभव बाविस्कर, विनोद संदांशिव, शामराव मोर उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






