कैमूर (बिहार) :- मधील जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नादरम्यान नवरदेवाला सासरच्यांकडून 5000 रुपये कमी मिळाले होते, त्यामुळे तो खूप रागावला आणि पत्नीवर अत्याचार करायचा. त्याने याच मुद्द्यावरून आता पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला घराबाहेर हाकलून दिल्याची भयंकर घटना घडली.पतीने पत्नीला गावापासून काही अंतरावर सोडलं. तिच्या पालकांना फोन करून हा प्रकार सांगितला.
मारहाणीनंतर पत्नीची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे तिच्यावर उपचार व्हावेत म्हणून पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, कैमूर जिल्ह्यातील करमचट पोलीस स्टेशन हद्दीतील अमांव गावात हुंड्यात 5000 रुपये न दिल्याने हुंडा हव्या असलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या बागी नदीच्या पुलाजवळ तिला सोडून दिलं.
घटनास्थळी पोहोचलेल्या पालकांनी जखमी अवस्थेत असलेल्या आपल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. जिथे विवाहितेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पीडित महिला अमांव गावातील शिवनंदन राम यांची 20 वर्षीय पत्नी असल्याचे सांगितलं जातं आहे. त्यांचं जून महिन्यातच लग्न झालं होतं. हुंडा 5000 पेक्षा कमी होता, त्यासाठी पती अनेकदा छळ करत असे.
माहिती देताना पीडितेच्या आईने सांगितले की, जून महिन्यात मुलीचे लग्न शिवनंदन राम याच्याशी झालं होतं. हुंडा म्हणून 5000 देणे बाकी होतं. त्यासाठी तो अनेकदा माझ्या मुलीचा छळ करत असे. त्यानंतर फोन आला की, मुलीला मारहाण करून गावापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर सोडून दिलं. याबाबत आम्हाला फोनद्वारे माहिती मिळताच आम्ही तेथे पोहोचलो. मुलगी जखमी अवस्थेत असल्याचे पाहिले, तिला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






