Viral Video: रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात, तरीही काही लोक जाणीवपूर्वक आपला जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा एक बाईक चालवताना दिसत आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या जगात तरुणाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात.
यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही.
काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जराही बॅलेंस न गामावता अत्यंत सराईतपणे तो स्टंटबाजी करतोय. अत्यंत खतरनाक पण तितकाच अचंबित करणारा हा स्टंट पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. बाईकमधून उडणाऱ्या फटाक्यांच्या ठिणग्या देखील त्याच्या अंगावर उडतायेत मात्र तरी देखील त्यानं आपलं नियंत्रण गमावलं नाही.
दरम्यान हा स्टंटबाज तरुण कोण आहे? ही स्टंटबाजी नेमकी कुठे केली जातेय या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र अवाक् झाले आहेत. या तरुणाला हॉलिवूड चित्रपटात काम द्या अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
हे. स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलिस वारंवार जनजागृती करत असतात. तरीदेखील अनेकजण स्टंटबाजी करत असतात. या स्टंटबाजांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
पाहा व्हिडीओ…..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






