आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता घर व जागा भाडेतत्त्वावर घेवून भाडे सुरू करावे म्हणून केली होती पैश्याची मागणी.
चाळीसगाव – ५० हजार रुपयाची लाचेची मागणी करणारे जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालिन आरोग्य अधिकारी व सध्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
लांडे यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुनमध्ये ही लाच मागितली होती. पण, त्यानंतर ते सावध झाले. पण, लाचेची मागणी केल्याप्रकरणी ते जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्याबाबत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरिता डॉ देवराम लांडे, DHO जळगाव (तत्कालिन) यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाच मागणी कारवाई…..
आरोपी – लोकसेवक डॉ. देवराम किसन लांडे, वय 52 वर्षे, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव. (सध्या नेमणूक जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव तसेच तालुका आरोग्य अधिकारी पाचोरा जि. जळगाव.)
लाचेची मागणी- 50,000/-₹
लाचेची मागणी दिनांक- ता.22/06/2023
सापळा अधिकारी:-
अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. मो. 8888881449
सापळा पथक –
पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील चालक पोहवा सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे
मार्गदर्शक –
मा.शर्मिष्ठाजी घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मो. नंबर- 9371957391
मा. माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक. मो. नंबर- 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो. नंबर 9822627288
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






