श्री सूर्यवंशी स्वकुळ साळी समाजातर्फे आजपासून दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

श्री गणेश,श्री महादेव,मारुतीसह विविध मूर्तींची प्राणप्रतिष्ठा.

एरंडोल l प्रतिनिधी एरंडोल- श्री सूर्यवंशी समस्त स्वकुळ साळी स्थानिक

पंच मंडळ,श्री विठ्ठल मंदिर गांधीपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (ता.६) आणि गुरुवार (ता.७) असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.समाजातील विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गांधीपुरा येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात श्रीगणेश, श्रीमहादेव,नंदी,हनुमान कासव यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात येणार आहे. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास देशभरातून हजारो समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

श्री सूर्यवंशी स्वकुळ साळी समाजातर्फे गांधीपुरा भागातील श्री विठ्ठल मंदिर येथे नवीन बांधकाम करण्यात आले असून याठिकाणीश्री गणेश,श्री महादेव, हनुमान,नंदी आणि कासव यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.बुधवारी दुपारी तीन वाजता सुरत येथील दिलीप राउत,किर्गीस्तानचे भारतातील मुख्य राजनैतिक अधिकारी डॉ.देवेंद्र साळी,राजकुमार साळी व श्री विठ्ठल मंदिराचे विश्वस्त,उत्सव समितीचे सदस्य, महिला मंडळ पदाधिकारी व समाजबांधव यांच्या उपस्थितीत स्वकुळध्वजरोहण करण्यात येणार आहे.

दुपारी चार वाजता सर्व मूर्तींची नगर प्रदक्षिणा मिरवणूक (कळसयात्रा) काढण्यात येणार असून कासोदा दरवाजा पासून कळसयात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठी जयगुरू व्यायाम शाळा आणि जयहिंद व्यायाम शाळा यांचे सहकार्य राहणार आहे.गुरुवारी पहाटे साडेसहा वाजता अकरा जोडप्यांच्या हस्ते यज्ञ याग पूजा करण्यात येईल.दुपारी तीन वाजता देणगीदार श्रीमती मंदाकिनी प्रकाश साळी,डॉ.देवेंद्र साळी,दीपा देवेंद्र साळी,युवा उद्योजक गौरव जाधव, हर्षदा जाधव, चंद्रकांत हावरे,बांधकाम समितीचे अध्यक्ष

अशोक रामरतन साळी,सचिव वासुदेव साळी,उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश साळी,अनिल डहाके,उदयकुमार साळी,प्रभाकर साळी,महेंद्र कापरे,क्षमा दत्तात्रय साळी यांचे उपस्थितीत कळसरोहण व कळस पूजन करण्यात येणार आहे.दुपारी चार वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा नामफलकाचे अनावरण आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असून देणगीदार आणि उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल..कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, माजीमंत्री डॉ.सतीश पाटील,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर ,युवा उद्योजक गौरव (सनी) जाधव,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,

बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, धनश्रीइन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, आल्हाद जोशी,पत्रकार संजय चौधरी उपस्थितराहणार आहेत.कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र स्वकुळ समाजाचे अध्यक्ष अशोक दांडेकर, सचिव भालचंद्र साळी,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अश्विनी मते,प्रांतिक सल्लागार अविनाश साळी,डॉ.देवेंद्र साळी यांचेसह देशभरातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजाचे ज्येष्ठ नेते श्री सोमनाथजी कासटकर हे अविरत परिश्रम घेत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार