मराठा क्रांती मोर्चा व महाविकास आघाडीतर्फे एरंडोलला रास्तारोको आंदोलन; तहसीलदार यांना दिले निवेदन पहा व्हिडिओ

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल :-
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चा व महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.समाजबांधव,महिला यांच्यावर
लाठीमार करणा-या पोलिसांवर कारवाई करून त्याना बडतर्फ करण्यात यावे,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी मराठा कांती मोर्चा व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन दिले.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.शांततेत सुरु असलेल्या उपोषणस्थळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतांना पोलिसांनी अचानक लाठीमार करून आंदोलन दहशत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.पोलिसांच्या लाठीमारात समाजबांधव आणि महिला,ज्येष्ठ नागरिक जखमी झाले

असून राज्य शासनाच्या आदेशाने निरपराध समाजबांधवांवर लाठीमार करणा-या पोलिसांना बडतर्फ करून त्यांचे विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.लाठीमाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.यापूर्वी मराठा समाजाने लाखो बांधवांचे शांततेत मोर्चे काढले आहेत.यावेळी देखील शांततेत उपोषण करणा-या समाजबांधवांवर लाठीमार करणा-या राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.आंदोलन करणा-या पदाधिका-यांनी विविध घ्शाना देवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.आंदोलन शांतेत पार पडले.आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्शल माने,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, तालुका प्रमुख रविंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले, जिल्हासरचिटणीस राजेंद्र शिंदे, आर.डी. पाटील,जगदीश पाटील,सुनील मराठे,माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, अभिजित पाटील, कृणाल महाजन, चिंतामण पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य नाना महाजन,

के डी पाटील,जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव. शहरप्रमुख कृणाल महाजन युवासेनेचे शहरप्रमुख प्रमोद महाजन, शिवसेना नेते गजानन पाटील, प्रशांत पाटील,प्रा.आर.एस. पाटील, संभाजी पाटील,सुनील चौधरी, कृणाल पाटील गुलाबसिंग पाटील,उमेश पाटील यांचेसह शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी कॉंग्रेस,विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी,महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मारागादर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

हे पण वाचा

टीम झुंजार