प्रतिनिधी l पारोळा
भरगाव वेगाने जाणारा इनोव्हा वाहनाने सायकल स्वाराला जोरदार धडक दिल्याने सायकल स्वार हा त्या अपघातात ठार झाल्याची घटना आज रात्री वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चार चाकी चालकाला अटक करण्यात आली आहे.
अजय शामराव शिंदे वय 35 राहणार शिवाजी विभाग पारोळा. हा आपल्या सायकलीने बांधकाम मजुरीचे काम करून घराकडे येत होता. राष्ट्रीय महामार्ग सहा वरील धरणगाव चौफुली वर जळगाव कडून धुळे कडे जाणारी इनोव्हा क्रमांक एम एच 18 बीसी 90 77 हिने जोरदार सायकल स्वारास धडक दिली. त्यामुळे सायकल स्वार अजय शिंदे हा गंभीर रित्या जखमी झाला.
त्याला कुटिर रुग्णालय येथे उपचार अर्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याबाबत दिलीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इनोव्हा चालक मोहम्मद हनीफ कुतुबुद्दीन शेख राहणार कसाब वाडा धुळे याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर विभागातील नागरिकांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम