निंभोरा कृषीतंत्र विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा कृषी तंत्र विद्यालयात 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपली डॉ राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी विद्यालयाचे विद्यार्थी व जळगाव येथून सन 2023 सन 2024 ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणी कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा निमित्त आलेले डॉ उल्हास पाटिल कृषी महा विद्यालयाच्या विदयार्थ्यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला
याप्रसंगी एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विद्यालया चे उपाध्यक्ष डॉ एस डी चौधरी व मान्यवर प्रमुख पाहुण्या नी डॉ राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाचे विद्यार्थी दीपक तायडे यांनी केले प्रास्तविक प्रथम वर्षाचे विद्यार्थी पवन कुमार पाटिल याने केले.

नंतर विदयार्थ्यांनी डॉ राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला वदंन करुन आपल्या भाषणातून शिक्षकाप्रति कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एस डी चौधरी प्राचार्य भंगाळे सर प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे काशिनाथ शेलोडे यांनी विदयार्थ्यांना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करुन शिक्षक दिना चे महत्व पटून सांगितले .

आभार प्रदर्शन प्रथम वर्षाची विदयार्थीनी नंदनी बडगे हिने केले सदर कार्यक्रमाला प्राचार्य उप पाचार्य विवेक बोडे सर एस एस महाजन सर जितेंद्र भावसार सर डी एच बावस्कर जितेंद्र कोळंबे विद्यार्थी निखिल पाटील चेतन पाटिल विवेक महाजन अनिकेत पाटिल मोहित पाटील नितेश पोहेकर तसेच जळगाव येथून आलेले कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कृषी दूत यश दाते नरेंद्र जाधव निलेश जाधव सचिन लोखंडे गुणवंत चौधरी मुकेश चौधरी शिक्षक वृद उपस्थित होते.

सदर कार्यक्रम गोदावरी फाउंडेशन डॉ उल्हास पाटील कृषी महा विद्यालय जळगाव च्या 2023 – 2024 ग्रामीण जागरुकता कृषी औदयोगिक कार्यानुभव प्राचार्य डॉ शैलेश तायडे समन्व्यक प्रा बी एम गोणशेटवाड कार्यक्रम अधिकारी प्रा एस टी पवार व सबंधित विषयातील विषय विशेष तज्ञ यांच्या मार्गद्शनाखाली पार पडला

हे वाचलंत का ?

टीम झुंजार