अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणाऱ्यास व त्यास मदत करणाऱ्या मित्रास चाळीसगाव पोलीसांनी सुरत येथून केले अटक.

Spread the love

प्रतिनिधी l चाळीसगाव :- शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक ०१/०८/२०१३ रोजी खबर प्राप्त झाली की, एक अल्पवयीन मुलगी वय १७ वर्षे हिस दि. ३१/०७/२०२३ रोजी फुस लावुन अज्ञात इसमाने तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेलेले आहे. तरी त्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिष्टर क्रमांक ३७७ / २०२३ भा. द. वि. कलम ३६३ अन्वये दाखल करण्यात आला. सदर गुन्हात आरोपी नामे शुभम संजय मोरे रा. ता. चाळीसगाव याने अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेलेबाबत तपासात निष्पन्न झाले होते.

सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीताचा तसेच अल्पवयीन मुलीचा कसून शोध घेण्यात आला परंतु आरोपी तसेच अल्पवयीन मुलीबाबत कोणताही ठाव ठिकाणा मिळुन आला नाही. सदर तपासादरम्यान आरोपीताचे नातेवाईक, मित्र यांचेकडे सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीताचे मित्रांनी पोलीसांना आरोपीचे ठाव ठिकाणा बाबत कोणतीही माहीती दिली नाही. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड यांना माहीती प्राप्त झाली की

” सदर आरोपी शुभम संजय मोरे यास अल्पवयीन मुलीस पळवून नेणे कामी त्याचा मित्र नामे राहुल जगन सुतार रा. सुरत याने मदत केलेली आहे”. राहुल सुतार यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता त्याने प्रथम पोलीसांना कोणतेही सहकार्य केले नाही. गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नामे पोहेकॉ राहुल सोनवणे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र वच्छे, पोकॉ उज्वल म्हरके, यांनी राहुल जगन सुतार रा. सुरत यास विश्वासात घेवुन सखोल चौकशीअंती माहीती दिली की, आरोपी शुभम संजय मोरे हा अल्पवयीन मुलीसोबत सुरत येथे आला होता. त्यास राहुल याने लपण्यासाठी भाड्याने रुम उपलब्ध करुन दिलेली आहे.

सदर उपलब्ध माहीती पोलीस निरीक्षक सो. श्री संदिप पाटील यांनी मा. रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव परीमंडळ, मा. अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांना कळविली असता , त्यांनी लागलीच सुरत येथे ‘जावुन आरोपी शुभम मोरे व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेणे कामी मार्गदर्शनपर सुचना दिल्या. त्याप्रमाणे वरील अधिकारी व स्टाफ यांनी लागलीच सुरत येथे जावुन आरोपी शुभम मोरे याने अल्पवयीन मुलीस ज्या ठिकाणी लपवुन ठेवले होते. त्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेवुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले.

सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान बस स्टैंड परीसरात सि. सी. टी. व्ही. कॅमेरे चेक करीत असतांना अल्पवयीन गुलीस आरोपी शुभम मोरे हा फुस लावुन पळवुन घेवुन जात असतांना त्याचा एक साथीदार हा मदत करताना दिसुन आलेला होता. त्याबाबत आरोपी शुभम मोरे याचेकडे पोलीस करटडी दरम्याण विचारपुस करता त्याने तो त्याचा मित्र असून त्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेवुन जाण्यास मदत केली असलेबाबत माहीती दिली. तरी सदर गुन्हाच्या तपासाअंती अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणारा शुभम मोरे त्यास सुरत येथे रुम उपलब्ध करून देणारा त्याचा मित्र राहुल सुतार यास अटक करण्यात आलेली असुन मा. विशेष जिल्हा सत्र न्यायालय जळगाव यांचे समक्ष हजर करण्यात आले आहे. सदर गुन्यातील आरोपी शुभम मोरे यास मदत करणारा त्याचे मित्राचा शोध घेत आहेत. सदर गुन्ह्यात अल्पवयीन मुलीचे वैद्यकीय तपासणीअंती भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एन) सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०११ चे कलम-४, ५ (एल), ८, १७ प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे…

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडुन पालकांना आवाहन

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडुन पालकांना आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन मुलींच्या बाबत कोणतीही तक्रार असल्यास, पालकांनी न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशन ला येवुन माहीती द्यावी. जेणेकरुन अश्याप्रकारचे गुन्ह्यांना तात्काळ पायबंद घालता येईल. तसेच युवकांमध्ये मोबाईलच्या सहाय्याने सोशल मिडीया वापराचे प्रमाण वाढलेले असुन पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांचे मोबाईल चेक करुन मुलं हे कोणाच्या संपर्कात आहेत काय ? याबाबत चौकस राहून नेहमी सतर्क रहाण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार