वाशिम :- जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४२ वर्षीय नराधमाने बलात्कार केला. ही संतापजनक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.गजानन गवई (वय ४२ वर्षे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.
दुपारच्या सुमारास १७ वर्षीय घरात एकटीच होती. याच गोष्टीची संधी साधून आरोपी पीडितेच्या घरात शिरला. घराचा दरवाजा बंद करत त्याने पीडित मुलीला आतल्या खोलील खेचत नेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. दरम्यान, पीडितेला वेदना असह्य झाल्याने तिने आई घरी येताच आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला.
मुलीवर बलात्कार झाल्याचं समजतास आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने फिर्याद दिल्यानंतर मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिकचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका नारखेडे करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






