प्रतिनिधी l पारोळा
देवगाव ता.पारोळा येथे दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या इसमाने रस्त्यांच्या कडेला चालणाऱ्या सहा वर्षीय लहान चिमुरडीला चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील देवगाव पासून एक किलोमीटर वस्तीत दुपारी तीन वाजेच्या सुमारास पूजा अनिल भिल (वय 6) रा देवगाव ता पारोळा ही गावातील वसंत जिभाऊ नगर परिसरात रस्त्याच्या कडेला चालत असताना मागून देवगावफाट्या कडून देवगावकडे
निलेश संजय बेलदार (वय 24) रा तमासावाडी ता पारोळा याने त्याच्या ताब्यातील आयसर गाडी एम एच 04 एच एस 4731 हिस दारूच्या नशेत भरधाव वेगाने पळवत असताना रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या सहा वर्षेय पूजाला जोरदार धडक देऊन गाडी खाली चिरडून गंभीर रित्या जखमी केले परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळी चालकाला ताब्यात घेतले व चिमुरडीला 108 रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता
वाटेतच तिचा मृत्यू झाला संतप्त जमावाने दारू पिऊन वाहन चालवत असलेल्या वाहन चालकाला चोप दिला व वाहनाचेही तोडफोड करून नुकसान केले, सहा वर्षीय चिमुकली ही जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ला शिक्षण घेत होती याबाबत या अपघाताने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती याप्रकरणी चिमुकलीचे वडील अनिल भीमा भील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम