भंडारा : शक्तीवर्धक गोळ्याचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरु असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतरही अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत. भंडारा जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पोलिस प्रशासन चांगलचं जागं झालं आहे. शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनानं तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. भंडारा इथल्या लॉजवर मैत्रिणीसोबत काल रात्री घालवायची असल्यामुळे त्या तरुणाने “व्हियाग्रा” नावाच्या गोळ्या घेतल्या असल्याचं पोलिसांनी प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं कशामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला हे स्पष्ट होईल.
तरुणीसोबत रात्र घालवायची असल्यामुळं……
ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो नागपूरचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीशी त्याची मैत्री झाली. त्याचं मोबाईलवरती बोलणं वाढल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या, त्यांची अनेकदा भंडारा जिल्ह्यात भेट होत होती. विशेष म्हणजे दोघांची ओळख दोन महिन्यापूर्वी झाली होती. त्या तरुणीसोबत रात्र घालवायची असल्यामुळे त्याने शक्तीवर्धक गोळ्यांचं अतिसेवन केलं होतं.
तरुणाचा रक्तदाब वाढल्यामुळं…
भंडारा इथल्या लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना घटना घडली आहे. तरुणानं “वायग्रा” या गोळ्यांचं शक्तिवर्धकासाठी अतिसेवन केलं आणि त्यात तरुणाचा रक्तदाब वाढल्यानं हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. मृतक तरुण 27 वर्षीय आहे, तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची एका ठिकाणी भेट झाली.
तरुणाचं अंग थंडगार पडलं…
शक्तीवर्धक गोळ्याचं अतिसेवन केल्यानं तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला, तरुणाचं अंग थंडगार पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण घाबरुन गेली. मैत्रिणीनं लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. शवविच्छेदन अहवालाची पोलिस वाट पाहत असून त्यानंतर तपासाची दिशा ठरेल. त्याचबरोबर त्या तरुणाच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह देण्यात येणार आहे.
खिशात मिळाल्या कामोत्तेजक गोळ्या…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाॅजवरील रूममधून कृष्णाच्या खिशातून कामोत्तेजक गोळ्यांचे पाकीट मिळाले. त्यातील १०० एमजीच्या दोन गोळ्या रिकाम्या होत्या. कृष्णाने त्या सेवन केल्याची माहिती प्रेयसीने पोलिसांना दिली. कृष्णाच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसले, तरी या गोळ्यांमुळे रक्तदाब वाढून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
ही घटना घडल्यापासून या तरुणांना झालंय तरी काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






