CCTV VIDEO: रस्त्याच्या कडेला बसले होते लोक, अचानक भूकंप आला अन्…. पहा व्हिडिओ, 1040 लोकांचा मृत्यू,1200 हून अधिक जखमी

Spread the love

CCTV VIDEO: मोरक्कोमध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका विध्वंसक भूकंपामुळे १०४० लोकांचा मृत्यू झाला.तर, १२०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे ऐतिहासिक शहर मोरक्कोपासून अ‍ॅटलस पर्वतावर वसलेल्या गावातील इमारती देखील कोसळल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत इतर देशांच्या अनेक नेत्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण बचावकर्त्यांना लांबवरील दूर्गम भागात पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा लागत आहे.

घरात झोपलेले लोक भूकंप आल्यानंतर घरातून बाहेर पळू लागले. शासकीय टीव्ही चॅनलवर या घटनांचे व्हिडीयो प्रसारित झाल्यावर लोक मराकेश शहरांच्या रस्त्यांवर येऊ लागले आणि इमारती कोसळत असल्याने आत जायला घाबरत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की भूकंप किती भीषण होता. या व्हिडीयोमध्ये काही लोक एका इमारतीच्या खाली बसलेले दिसत आहेत. अशातच भूकंप येतो आणि इमारत जोरात हलायला लागते. या लोकांना जमीन हलत असल्याचे जाणवते , ते तेथून लगेच पळ काढण्याचा प्रयत्न करतात.

या फुटेजमध्ये मोठ्या संख्यने लोक इकडून तिकडे पळताना दिसत आहेत. यादरम्यान काही लोक पळताना रस्तात पडतात. व्हिडीयोच्या शेवटी पाहिल्या जाऊ शकते की हा भूकंप इतका भीषण होता की एक इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ट्विटरवर (एक्स)वर बीएनओ न्यूजने हा व्हिडीओ अपलोड केला आहे, जो व्हायरल झाला. आता पर्यंत हा व्हिडीयो दीड लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. भूकंपानंतर, एका व्यक्तीने सांगितले की तो जवळच्या अपार्टमेंटमध्ये जात होता, तेव्हा अचानक भांडी आणि भिंतीवर टांगलेल्या वस्तू पडू लागल्या. एका महिलेने सांगितले की, ‘तीव्र हादरे’ जाणवल्यानंतर ती घरातून बाहेर पडली. एका मुलाला हातात धरलेल्या एका माणसाने सांगितले की तो भूकंपाच्या धक्क्याने जागा झाला होता. पिवळे जॅकेट घातलेले आपत्कालीन कर्मचारी इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या वाचलेल्यांचा शोध घेत होते.

मोरक्कन मीडियाने वृत्त दिले की शहरातील सर्वात प्रसिद्ध साइट्सपैकी एक असलेल्या १२ व्या शतकातील कौटुबिया मशीदीचे नुकसान झाले आहे. परंतु नुकसान किती प्रमाणात झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा 69-मीटर (226-फूट) मिनार ‘माराकेशचे छप्पर’ म्हणून ओळखला जातो.

मोरोक्कन लोकांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळलेल्या आणि ढिगाऱ्यात जमा झालेल्या दिसतात आणि आजूबाजूला धूळ दिसत आहे. माराकेश शहराच्या नजिकच्या लाल भिंतींच्या काही भागाचे नुकसान झाले आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार