Only 3 Ingredients For cold- cough to kids: सध्या वातावरणातील बदलामुळे घरोघरी हे दुखणं सुरू आहे. म्हणूनच मुलांना सर्दी- खोकल्याचा, कफचा त्रास झाला तर हा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय करून बघा..
१ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा उपाय करावा, असं डॉक्टर सांगत आहेत.
वातावरण थोडंसं जरी बदललं आणि मुलांची काळजी घेण्यात आपण कमी पडलो, तर मुलं लगेच आजारी पडतात. सर्दी- खोकला होतो. तो वाढत गेला तर मग छातीत कफ जमा होतो आणि मग पुढचे अनेक दिवस तो त्रास होत राहतो. शिवाय शाळेत जाणारी जी मुले आहेत ती मुले शाळेतून सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन घेऊन येतात. आणि मग एकाला हा त्रास सुरू झाला की तो हळूहळू घरात सगळ्यांनाच होत जातो. म्हणूनच मुलांचं दुखणं आटोक्यात आणायचं असेल तर हा एक घरगुती उपाय करून बघा.
हा उपाय आपल्या आजीबाईंच्या बटव्यातलाच आहे, पण तो एका डॉक्टरांनी सुचवला आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा उपाय करावा, असं डॉक्टर सांगत आहेत.
सर्दी- खोकला- कफ झाल्यास घरगुती उपाय
- १. हा उपाय इन्स्टाग्रामच्या dr.nitasha_gupta या पेजवर शेअर करण्यात आला असून तो करण्यासाठी आपल्याला आल्याचा एक छोटासा तुकडा, गुळाचा लहानसा खडा आणि तुळशीची ८ ते १० पाने लागणार आहेत.
- २. सगळ्यात आधी तर तुळशीची पाने आणि आलं व्यवस्थित धुवून घ्या.
- ३. त्यानंतर एका किसनीने तुळशीची पाने, आल्याचा तुकडा आणि गुळाचा खडा किसून घ्या.
- ४. आता हा जो एकत्रित केलेला किस आहे, तो व्यवस्थित एका वाटीत घट्ट पिळून घ्या आणि त्या तिन्ही पदार्थांचा रस काढून घ्या.
- ५. हा रस आता आपल्याला मुलांना चाटवायचा आहे.

कोणत्या वयोगटासाठी किती रस द्यावा?
- १ ते ५ वर्षे या वयोगटातली जी मुले आहेत त्यांना हा रस पाव- पाव चमचा म्हणजेच ४ ते ५ थेंब दिवसातून दोन वेळा द्यावा.
- जी मुले ६ ते १५ वर्षे या वयोगटातली आहेत, त्यांना हा रस अर्धा- अर्धा चमचा दिवसातून दोन वेळा द्यावा.
- मोठ्या व्यक्तीही हा रस घेऊ शकतात. त्यांनी एकेक चमचा रस दिवसांतून दोन वेळा घेतला तरी हरकत नाही.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






