नवीन वसाहतीमध्ये सर्वत्र चिखल,घाणीमुळे पायी चालणे कठीण, मरण यातना झाल्यात असाह्य.

Spread the love

मुरूम,कच नटाकल्यास 11तारखेपासून नागरीक बसणार बेमुदत उपोषणाला मुख्याधिकारी न.पा. एरंडोल यांना दिले निवेदन.

एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल – येथील धरणगांव रस्ता लगतच्या नवीन वसाहतीमध्ये सततच्या पावसामुळे सर्वत्र चिखल, घाणीमुळे पायी चालणे कठीण झाले असून मरण यातना आता असह्य झाल्या आहेत. वृध्द (महिला-पुरूष) लहान मुले चिखलामुळे पडून जखमी झाले आहेत. नपास अनेक वेळा मुरूम, कच, हार्डमुरूम टाकण्यासाठी विनंती केली परंतू दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत.

दि.९/९/२०२३ (शनिवार) मुरूम न टाकल्यास सोमवार दि. ११/९/२०२३ पासुन सकाळी ११ वाजेपासुन जेष्ठ नागरीक नामदेवराव धुडकू पाटील यांचे सह परिसरातील नागरीक बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
सदर बाबतीत मुख्याधिकारी न.पा. एरंडोल यांना निवेदन (दि.७/९/२०२३) देण्यात आले असून निवेदनाच्या प्रति प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनानंतर नामदेव धुडकू पाटील, गजानन पुंडलीक पाटील, सचिन साहेबराव पाटील, पंकज नामदेव चौधरी, कैलास रामचंद्र कुवर, रविंद्र पाटील, योगेश चौधरी, समाधान पाटील, सुनिल मराठे, राजेंद्र मराठे, आदीच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, धरणगांव रोड लगतच्या नवीन वसाहतीमध्ये रस्ते, पाणी वैतागले असून तक्रारी तरी किती वेळा कराव्यात विशेष खेदाची बाब म्हणजे आम्ही सर्व नागरीक नपाचे भरमसाठ कर नियमीत भरणारे असून मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही घरे बांधली परंतू रस्त्याअभावी आम्हाला जीवन जगणे कठीण झाले तसेच वाहन चालविणे तर दुरच परंतू आम्हाला पायी चालणे देखिल कठीण झाल्याने आम्हास उपोषण करावे लागत आहे. तरी त्वरीत दखल घ्यावी उपोषण दरम्यान कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास आपणच जबाबदार राहणार असाही इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार