
पाचोरा :- येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात पाचोरा नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण पूरक अश्या 3.50 लक्ष मात्र रकमेच्या 2 Hudraulic इलेक्ट्रिक घंटागाडी वाहन खरेदी करण्यात आल्या त्यांचे उदघाटन मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना वाहनाची चावी देऊन करण्यात आले. सदरचे वाहन हे 3 तास चार्जिंग केल्यानंतर 100 की. मी. चालते. या वाहनाची क्षमता 1.5 टन असून वाहनास 40 की मी प्रति तास असा आहे.
सदरच्या उदघाटन प्रसंगी मा. ना. एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मा.उद्योग मंत्री उदयजी सामंत आमदार किशोर आप्पा पाटील, मदत व पुनर्वसन मा.मंत्री अनिल भाईदास पाटील, खा. उन्मेश दादा पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, व जिल्ह्यातील आजी माजी आमदार, पदाधिकारी तसेच पाचोरा न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम