
पाचोरा :- डॉक्टर असोसिएशन ही पाचोरा शहरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली एकजूट प्रामाणिक प्रभावशाली व सर्व डॉक्टरांच्या मदतीस धावून येणारी अशी समिती आहे.
पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे अद्भुत शांतता व निखळ आनंद देणारा प्रेरणादायी कार्यक्रम लव यू जिंदगी अर्थपूर्ण जीवनासाठी हृदय संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमानंतर पाचोरा डॉक्टर असोसिएशन बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मावळत्या कार्यकारणीतील अध्यक्ष दिनेश सोनार, चेअरमन डॉ सुनिल पाटील,उपाध्यक्ष डॉ अतुल पाटील, सेक्रेटरी नंदकिशोर पिंगळे, सहसचिव डॉ हर्षल देव, खजिनदार डॉ जिवन पाटील यांनी ही बैठक चे आयोजन केले व नवीन कार्यकारणी जाहीर केली. नवीन कार्यकारणी मध्ये डॉक्टर भरत पाटील हे चेअरमन तसेच डॉक्टर अतुल पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर डॉक्टर प्रवीण माळी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
तसेच नवीन कार्यकारणीत डॉक्टर राहुल काटकर खजिनदार, डॉक्टर हर्षल देव सचिव, डॉक्टर संकेत विसपुते सहसचिव, डॉक्टर बन्सीलाल जैन व डॉक्टर राहुल झेरवाल प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभागाची जबाबदारी डॉक्टर वीरेंद्र पाटील व डॉक्टर योगेश इंगळे तसेच स्पोर्ट्स विभागाची जबाबदारी डॉक्टर तोसिफ पठाण व डॉक्टर सिद्धांत तेली यांच्याकडे देण्यात आली. सदर कार्यकारिणीची निवड शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध करण्यात आली
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम