जामनेर तालुक्यातील संतापजनक घटना! नवजात मुलीच्या तोंडात बापानेच तंबाखू कोंबून केली हत्या      

Spread the love

बेटी बचाओ,बेटी पढाओ नियोजनाला जामनेर तालुक्यात हरताळ.    जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील वाकोद जवळील  हरि नगर तांडा येथील बापानेच नवजात आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखूचा विडा कोबूंन पोटच्याच मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ असलेल्या हरि नगर तांडा येथील गोकुळ गोटीराम जाधव (वय-३०) याला आधीही दोन मुलीच असल्याने त्याने तिसरीही मुलगीच झाल्याने त्याने असे निंदनीय क्रुत्य केल्याचे समजते.

२ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात गोकुळ जाधव याला तिसरी मुलगी झाली.आरोग्य केंद्रातुन पत्नीची  सुटी झाल्यानंतर आशा सेविका गोकुळ जाधवच्या घरी नवजात बाळाची नोंद घेण्यासाठी गेली असता बाळा विषयी विचारपुस केल्या नंतर बाळ वारले असल्याचे आशा सेविकेला सांगण्यात आले. परंतु ते सुदृढ असताना कसे वारले या विषयी शंका आल्याने आशा सेविकेने ही बाब वरिष्ठ डॉक्टरांना कळविले. डॉक्टरांनी गोकुळ यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता.

आरोपी गोकुळ याने तिसरीही मुलगी झाल्याने असे निंदनीय क्रुत्य करून पोटच्याच अवघ्या ८ दिवसाच्या चिमुरडीचा असा अंत केल्याची कबुली दिली. या घटने बाबत आरोपी गोकुळ जाधव विरोधात पहुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा मुलगी एक समान, बेटी बचाओ,बेटी पढाओ अशा शासकीय घोषणा फक्त कागदावरच राबविण्यात येतात का ? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत असुन.मुलगा मुलगी अशी मनात असलेली असमानतेची निर्माण झालेली दरी समाज मनातील मुलां,मुलींविषयीचा भेदभाव हद्दपार होईल तेव्हाच अशा निंदनीय घटना घडणार नाही हेही तितकेच सत्य म्हणून स्विकारल्यास वावगे ठरू नये.

हे पण वाचा

टीम झुंजार