झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे घवघवीत यश आल्याने भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुका यांच्या वतीने जल्लोष करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी सांगितले की उत्तर प्रदेश मध्ये 35 वर्षा नंतर दुसऱ्यांदा निवडून येण्याचे श्रेय मोदींच्या नेतृत्वाखाली योगीजीना मिळाल्यामुळे तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली चार राज्यांमध्ये आम्ही सरकार बनत असल्यामुळे खूप आनंदी झालो आहोत असे सांगितले.
त्याप्रसंगी उपस्थितअमोल जाधव ,राजेंद्र पाटील तालुका सरचिटणीस ,रवी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन , ओबीसी चे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, निराधार समितीचे माजी अध्यक्ष सुनील पाटील नगरसेवक जहिरोद्दीन शेख कासम ,अकील शेख, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन,युवा मोर्चा शहराध्यक्ष , सुनील चौधरी, संजय साळी, अजेंद्र पाटील, वाल्मीक सोनवणे सुभाष पाटील दीपक महाजन ,धनराज पाटील लोकेश महाले , कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ:- एरंडोल येथे फटाक्यांची आतिषबाजी करताना अमोल जाधव, अशोक चौधरी, रवींद्र महाजन सुनील पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते