Viral Video:पतीला परीक्षेचे कारण सांगून पत्नी बॉयफ्रेंडसोबत फिरतांना पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर झाला हायहोल्टेज ड्रामा पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही घटना सोशल मीडियाच्या माध्यामातून अगदी क्षणात सर्वत्र पसरते. अनेकदा सोशल मीडियावर असे काही हायहोल्टेज ड्रामा झालेले व्हिडिओ समोर येतात, जे पाहून नेटकरीही चक्रावतात. सध्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

परिक्षेचे कारण सांगून बॉयफ्रेंडसोबत मजा…

विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे काही नवीन नाहीत. विवाहबाह्य संबंधातून झालेले अनेक वाद, हत्यांच्या घटना समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. घरात पतीला परीक्षेचे कारण सांगून बाहेर पडलेली पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना रंगेहाथ सापडल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

ही तरुणी परीक्षेला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र पतीला संशय आल्याने त्याने तिचा पाठलाग केला. यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत केटीएमवर फिरत असल्याचे दिसले. दोघांना भररस्त्यात पकडल्यानंतर पतीने भररस्त्यात गोंधळ घालायला सुरूवात केली.

पतीने रंगेहाथ पकडले….

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पत्नी त्याच्या बॉयफ्रेंडसोबत केटीएम गाडीवर आरामात फिरताना पतीला दिसते. त्या दोघांना अडवून तो रस्त्यात चांगलेच सुनावतो. घरी परीक्षेला सांगून तु फिरत आहेस, असे म्हणत तो पत्नीला मारहाण करतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पत्नीच्या प्रियकरालाही त्याने चांगलेच फैलावर घेत लाज वाटत नाही का? अशा शब्दात खडसावले. मात्र पत्नी तो मित्र असल्याचे सांगत गाडी बंद पडल्याने थांबलो असल्याचे स्पष्टिकरण देत आहे. पती मात्र पत्नीच्या या कृत्यावर चांगलाच संतापला असून पत्नीला खडेबोल सुनावत आहे.

व्हिडिओ व्हायरल…

सोशल मीडियावर आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ही तर दुसरी ज्योती मौर्या असल्याचे म्हणले आहे. तर काही नेटकऱ्यांनी पतीला फसवताना लाज वाटत नाही का? असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. पत्नी- पत्नीच्या या हायहोल्टेज ड्राम्याची सध्या माध्यमांवर चांगलीच चर्चा होत आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार