मराठा समाजावरील लाठी हल्ल्याचा निषेध.
निंभोरा बु. प्रतिनिधी:- परमानंद शेलोडे
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सराटी ता. अंबड येथे शांततेत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी बेशुट व अमानुष लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाने रावेर तालुक्यातील वडगांव फाटा रस्ता ( बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर ) महामार्गावर मराठा समाज बांधवाने रास्ता रोको करीत आंदोलन केले. या वेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदविण्यात आला.
वडगांव फाटा रस्त्यावर बुधवार सकाळी 10.वाजता आंदोलनास सुरुवात झाली.
सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांचा अमानुषपणे लाठी चाराच्या निषेधार्थ वडगांव येथील सरपंच धनराज देविदास पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा सादर करून आंदोलनास पाठिंबा दिला.
मराठा समाजाला सर सकट कुणबी प्रमाणपञ देण्यात यावे.तसेच मराठा समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्या सर्व पोलीसांना निलंबित करण्यात यावे.
असे निवेदन शासन दरबारी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांना देण्यात आले.
यावेळी माजी सरपंच डिगंबर चौधरी, नितीन पाटील, प्रमोद कोंडे, पवन चौधरी, धनराज पाटील सरपंच वडगांव,वाय. डी.पाटील, स्वप्निल गिरडे,संजय सोनवणे, डॉ. मनोहर पाटील, राजीव बोरसे,हेमंत पवार, चैतन्य कोंडे, योगेश चौधरी, अमोल पाटील, बाळू विचवे, पंढरी महाले, हेमंत पाटील, पियुष पाटील, रविंद्र विचवे,गुणवंत उंबरकर,राहुल गुरव, विष्णु कोळे, तसेच निंभोरा रिक्षा स्टॉप युनियन यांच्या सह सकल मराठा समाजातील नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत होते. निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महामार्गावर दोन्ही साईडला ट्राफिक जाम झाली होती. आंदोलन शांततेत पार पडले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






