अमळनेर हून धरणगाव जाण्यासाठी ढेकू – सारबेटे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
जळगाव, दि.१४ सप्टेंबर (जिमाका) – अमळनेरहून धरणगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे अंतर्गत बोगद्याचे काम सुरू असल्याकारणाने सदर रस्ता दूचाकी वगळता सर्व जड वाहनांसाठी पुढील चार महिन्यासाठी बंद करण्यात आलेला आहे. वाहनधारकांनी अमळनेरहून धरणगाव कडे जाण्यासाठी ढेकू- सारबेटे मार्गाचा वापर करावा. असे आवाहन अमळनेर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
अमळनेरहून धरणगाव जातांना चांदणी कुर्हे- सती माता मंदिर येथे फाटक क्रमांक १३७ येथे एका बाजूच्या बोगद्याचे काम झाले आहे. एका बाजूचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर पासून हा मार्ग पुढील चार महिन्यांसाठी जड वाहनांसाठी बंद असणार आहे. दूचाकी वगळता एसटी, ट्रक, ट्रॅक्टर, मालट्रक यांसारख्या जड वाहनांनी धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४