इंदापूर l प्रतिनिधी (हर्षल वाघमारे). आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवास्थानी बैठक पार पडली या बैठकीला आमदारांना येताना निवडणूक आयोगाशी संबंधित प्रतिज्ञापत्र सोबत आणण्याचे आदेश दिले होते परंतु निम्म्यापेक्षा अधिक आमदारांनी प्रतिज्ञापत्र आणली नाहीत त्यामुळे अजित दादा पवार यांच्या सह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या आमदारांना समज दिल्याचे कळते
इंदापूर तालुक्यात मात्र आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या सह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म.अजितदादा पवार साहेब यांना पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून इंदापूर तालुक्यातील गावा गावामधून पाठवले जात आहेत निमगाव केतकी चे सरपंच मां. प्रवीण भैया डोंगरे यांनी प्रतिज्ञापत्र तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे इंदापूर तालुकाद्यक्ष मां हनुमंत आबा कोकाटे यांच्याकडे सुपूर्त केले सोबत अड शुभम निंबाळकर सचिन खमगळ हर्षल वाघमारे अड जलिंदर घाडगे उपस्थित होते
त्याचबरोबर मदनवाडी तक्रारवाडी चे पुणे जिल्हा परिषद सदस्य मां हनुमंत नाना बांडगर यांनी हर्षल वाघमारे यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सुपूर्त केले विविध विभागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आता दर मंगळवारी पक्ष कार्यालयात आमदारांची बैठक पार पाडली जाणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






