जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील हरि नगर (तांडा) येथे तिसरीसुद्धा मुलगी झाली म्हणून पित्याने तोंडात तंबाकू कोंबून झोळीत टाकून आठ दिवसाच्या चिमुकलीचे प्राण घेतल्याची दुर्दैवी घटना होती. मात्र जामनेर आरोग्य विभागाच्या सजगतेने अशी निंदनीय घटना उघड झाली.या घटनेची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्यासह, जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र वाकोद डॉ.संदीप कुमावद,आरोग्य सहाय्यीका निर्मला कुमावद,गटप्रवर्तक यमुनाबाई चौधरी- पाटील,आशा स्वयंसेविका मंगला जाधव,वाहन चालक विजु पांढरे या
जामनेर टीमला बोलावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून स्वतः अग्निपंख हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.सदर प्रसंगी,जळगांव चे आमदार सुरेश भोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, मानस विकार तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन उपस्थित होत्या.जिल्हाधिकारी यांनी सर्व टीमशी हितगुज करून तालुक्यात “बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम” व गरोदर मातांची ए.एन.सी. ट्रेकिंग करून त्यांची देखरेख व करडी नजर ठेवण्याबत मोहीम महिला बालविकास विभाग ,आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग याच्या संयुक्त विद्यमाने राबविण्याच्या सक्त सूचना दिल्या.
तसेच कुटूंब कल्याण योजना प्रभावीपणे राबवून दोन अपत्यावर कुटुंब नियोजन शस्कक्रियेसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. आशा स्वयंसेविका मंगला जाधव यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले.व कोणतीही समस्या असल्यास केव्हाही संपर्क करण्याच्या सूचना टीमला दिल्यात.सर्व टीमला मोटिव्हेशनल व्हिडीओ दाखवून सर्वांचा उत्साह वाढविला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






