दुर्देवी घटना! हसतं- खेळतं असलेलं कुटुंब गाढ झोपेत असताना घराचे छत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू मृतांमध्ये ३ अल्पवयीन मुलांचा समावेश.

Spread the love

लखनौ :- या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लखनौ शहरात आलमबाग रेल्वे कॉलनीत शनिवारी सकाळी जुन्या घराचे छत कोसळले .या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील पाच जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

झोपेत असतानाच काळाने घात केला……
घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असतानाच ही दुर्देवी घटना घडली. त्यामुळेच घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेत ४० वर्षीय सतीश ३५ वर्षीय सरोजिनी देवी, १३ वर्षीय हर्षित, १० वर्षीय हर्षिता आणि ५ वर्षीय अंश यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक…

दरम्यान, आलमबाग रेल्वे कॉलनी दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकार्‍यांना मदतकार्याला गती देण्यास सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार