मुलीच्या अंगात आलेले भूत उतरवण्यासाठी अघोरी विद्या प्रयोग करून छळ करणाऱ्या तीन भोंदूबाबांना पोलिसांनी केले जेरबंद.

Spread the love

बीड : बंद खोलीत एका मुलीच्या अंगात आलेले भूत उतरवण्यासाठी अघोरी विद्या प्रयोग करून छळ करणाऱ्या तीन भोंदूबाबांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी तिघांना अटक केली.
चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला येथील एका वस्तीवर एका मुलीवर बंद खोलीमध्ये रात्रभर बाहेरगावचे काही लोक अघोरी विद्येचा प्रयोग करत असून, ती मुलगी जोरजराने किंचाळत आहे.

अघोरी विद्या करणारे लोक हे मोठमोठ्याने आरडाओरड करत आहेत.मृत्यूनंतर आत्म्यासोबत 1 तासात घडतात ‘या’ 7 गोष्टीभूत आणि देव अंगात आल्याबाबतच्या गोष्टी मोठ्याने करत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी जावून पीडित मुलीची भोंदूबाबांच्या तावडीतून सुटका करून औषधोपचाराची गरज असल्याने तिला तिच्या आईसोबत दवाखान्यात पाठवले.

जादूटोणा करणारे भोंदूबाबा संजय रावसाहेब नवगिरे, गणेश रावसाहेब नवगिरे, दिलीप रावसाहेब नवगिरे यांना ताब्यात घेतले. पीडित मुलीचे वडील एकनाथ दगडू खंडारे यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हे पण वाचा

टीम झुंजार