जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने केला; अल्पवयीन मुलीचा विनयभंग,शिक्षकाच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

Spread the love

सटाणा :- तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील दूधमाळ वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी सटाणा पोलिसांत पॉक्सो अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक भास्कर सोनवणे (रा. सटाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन १६ वर्षीय मुलीच्या फिर्यादीनुसार, गेल्या १५ तारखेला शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी देण्यासाठी वस्तीशाळेवर गेली.

त्या वेळी संशयित दीपक सोनवणे याने मोबाईलवरील व्हिडिओ कसा बनवितात, याची माहिती अल्पवयीन मुलीला विचारली असता, तिने सांगितले.त्यानंतर ती धुतलेले भांडे रुममध्ये ठेवण्यासाठी गेली असता, संशयित दीपक सोनवणे तिच्यामागे आला आणि तिचा हात धरून विनयभंग केला केला. याप्रकरणी पीडितेने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर सटाणा पोलिसांत पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार