झुंजार । प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साहायाने अर्थसंकल्प मांडला. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार ; अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साहायाने अर्थसंकल्प मांडला. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.