एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- शासनाचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग म.राज्य अंतर्गत येणा-या सर्व शासकीय आय.टी. आय.मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या. वाढदिवसानिमित्त सदर खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर “पि.एम.स्कील रन ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यानुसार शासकीय आय.टी.आय एरंडोल जि.जळगाव तर्फेसुध्दा पि.एम.स्कील रन या ५ कि.मी.अंतराच्या रनिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत शासकीय आय.टी.आय व शहर आणि तालुक्यातील १६ वर्षे वयापुढील तरूण मुला-मुलींसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
सध्याच्या पावसाळी वातावरणात देखील दिड दोनशे तरूणांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी शासकीय आय.टी.आय (शेतकी संघा)पासून ग्रामीण रूग्णालय एरंडोल व तेथून परत आय.टी.आय पर्यंत च्या एकूण ५ कि.मी.च्या अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत मुला- मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा होती.स्पर्धेत प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना शासनाकडून मंत्रालयातर्फे प्रमाणपत्र व अनुक्रमे रू ३००० ,२०००,१००० /- चा धनादेश प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्यांना धनादेश व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग,मंत्रालय दिल्ली तर्फे संपूर्ण देशभर जुलै – 2023 मध्ये घेण्यात आलेल्या आयटीआय परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मार्क मिळवून उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना पदवीदान समारंभ आयोजित करून त्यांनाही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा.आमदार यांचेसह ,मा.उद्योजक पंकज काबरा,शहर प्रमुख आनंदा चौधरी,संजय चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयटीआय चे प्राचार्य मा.नवनीत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






