जळगावसह 16 जिल्ह्यात 100 खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करणार – अजित पवार

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

मुंबई: आजच्या अर्थसंकल्पात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये महिला व नवजात शिशूंसाठी स्त्री रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज, शुक्रवारी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्य सरकारनं महिलांसाठी मोठी घोषणा केली.

जळगावसह हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

.

टीम झुंजार