एशियन गेम्स २०२३ – महिला क्रिकेट; भारतीय संघ उपांत्य फेरीत

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाला स्पर्धेमध्ये उच्च मानांकन आहे. मलेशिया संघाविरुद्ध भारताने १७४ धावांचे लक्ष ठेवले होते.

स्मृती मानधना (२७), शेफाली वर्मा (६७), जेमिमाह रॉड्रिग्ज (नाबाद ४७), रिचा घोष (नाबाद २१) यांनी केवळ १५ षटकांमध्ये १७३ धावा संघाच्या नावावर झळकवल्या. मलेशियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात येऊन केवळ दोन चेंडू खेळला, पण त्यानंतर पावसामुळे सामना पुढे खेळवता आला नाही आणि भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

हे पण वाचा

टीम झुंजार