एकूण 18 लोकांची 30 लाख 54 हजार झाली फसवणुक. तिन्ही आरोपींना अटक.
चाळीसगाव :- दि.20/09/2023 रोजी फिर्यादी श्री .स्वप्नील युवराज चौधरी, रा.MJ नगर, चाळीसगांव यांनी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशला फिर्याद दिली की,आरोपी 1) संभाजी दगडू पाटील, 2) अनिकेत संभाजी पाटील, 3) आकाश संभाजी पाटील सर्व रा. टाकळी प्र. चा. ता. चाळीसगांव यांनी सर्वांनी संगनमत करून फिर्यादी यांना CNG गॅसपंप मंजुर करून देतो असे अश्वासन देवून ,तसेच विश्वासात घेवून CNG गॅस पंप मंजुरीसाठी ॲडव्हान्स म्हणुन 20,20,000/- रुपये घेवून कोणत्याही प्रकारचा CNG गॅसपंप मिळवून न देता फसवणुक केली म्हणुन चाळीसगांव शहर पोस्टे ला त्यांचे विरुद्ध गुरनं. 460/2023 भादवि कलम 420,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता ..
सदर गुन्ह्याचा तपासा दरम्यान एकुण 18 साक्षीदाराना सुद्धा पशुपालन कर्ज / पर्सनल लोन / शेळी पालन कर्ज मंजुर करून देतो किवां अनुदान मिळवून देतो अशा कारणांसाठी पैसे घेवून कोणत्याही प्रकारचे कर्ज व अनुदान मिळवून न देता त्यांची फसवणुक केलेली आहे. आज पावेतो फिर्यादी समवेत 18 साक्षीदार यांची आरोपीतांनी एकुण 30,54,000/- रुपयांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्यात अजुनही इतर साक्षीदार यांची फसवणुक झाल्या बाबत संशय आहे. सदर गुन्ह्याचे स्वरूप पाहता मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो.मा. सहा. पोलीस अधिक्षक श्री. अभयसिंग देशमुख सो. यांनी आरोपीतांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील सो यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी, पोकॉ अमोल पाटील, प्रकाश पाटील, पवन पाटील, भरत गोराळकर, महिला पोलीस अमंलदार सबा शेख व विमल सानप
या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी
1) संभाजी दगडू पाटील, 2) अनिकेत संभाजी पाटील, 3) आकाश संभाजी पाटील सर्व रा. टाकळी प्र. चा.
ता. चाळीसगांव यांचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतांना कोर्टासमोर पेश करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून सदर आरोपीतांनी फसवणुकीच्या रकमेची विल्हेवाट कशी लावली याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी व पोकॉ अमोल पाटील हे करीत आहे.
तरी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन येते की, सदर आरोपी संभाजी दगडू पाटील याने कोणाची फसवणुक केली असेल तर त्यांनी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला व सपोनि दिपक बिरारी ( मो. क्रं. 9850567386) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






